सलग दुसऱ्या वर्षी बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट

सांगोला (त" /> सलग दुसऱ्या वर्षी बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट

IMG-LOGO
Home संस्कृती सलग दुसऱ्या वर्षी बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट
संस्कृती

सलग दुसऱ्या वर्षी बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट

September 2021 99 Views 0 Comment
IMG

सलग दुसऱ्या वर्षी बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट

सांगोला (तालुका प्रतिनिधी): दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण अमावास्येला बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. मात्र, इतिहासात मागील वर्षी प्रथमत: बैलपोळा हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना साधेपणाने साजरा करावा लागला होता. या वर्षीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता, सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांना बैलपोळा हा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.

 

      कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी विविध सण-उत्सवावर बंधन आली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळा सणावर यंदा दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने घरच्या घरीच पोळा सण साजरा करण्याची वेळ आता बळीराजावर आली आहे. त्यामुळे यंदा बैल पोळ्याचाही आनंद हिरावला गेला आहे. यंदा चांगला पाऊस पाणी झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अशात पोळा साजरा करण्यासाठी शेतकरी सज्ज होता. मात्र, सार्वजनिक स्तरावर हा सण साजरा करण्यासाठी प्रशासनाने बंदी घातल्याने बळीराजाचा हिरमोड झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियम पाळून सण साजरा करण्याची वेळ यंदा शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांवर आली आहे.

 

      प्रत्येक शेतकऱ्यांकडून सकाळी बैलांची अंघोळ, त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या अंगावर झालर तसेच विविध वस्तूंनी त्यांना सजविले जाते. त्यानंतर संध्याकाळी बैलांची प्रत्येक घरोघरी शेती उपयोगी साहित्यासोबत विधीवत पूजा केली जाते. नंतर त्यांना पुरणपोळीचे पदार्थ खाऊ घातले जातात. अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये बैलपोळा सण साजरा होत असतो. शेतीला बरकत मागत दरवर्षी शेतकरी पोळा सण उत्साहात साजरा करतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे पोळा सणावर सावट पसरले आहे. पोळ्याला बैलासह अन्य जनावरांची खरेदी-विक्री होत असते. कोरोनामुळे आठ महिन्यांपासून आठवडीबाजार बंद असल्याने यंदा पोळ्याला जनावरांची खरेदी-विक्रीही नाही. गर्दी करण्याला बंदी असल्याने पोळ्याला बैलाच्या मिरवणुका निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे सजावटीच्या साहित्यालाही मागणी झाली नाही.