ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय को" /> ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अभय कोणाचे?
IMG-LOGO
Home आरोग्य ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अभय कोणाचे?
आरोग्य

ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अभय कोणाचे?

September 2021 118 Views 0 Comment
IMG

 

ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय कोणाचे?

 

कोविड हॉस्पिटलच्या नावाखाली इतर आजाराच्या रुग्णाला तपासण्या आगोदरच पुढील रस्ता दाखविण्याचा शुध्द प्रामाणिक उद्योग सांगोला ग्रामीण रुग्णालयातून सुरु

 

सांगोला प्रतिनिधी :

कोविड हॉस्पिटल च्या नावाखाली इतर कोणत्याही आजारावर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तपासण्या आगोदरच पुढील रस्ता दाखविण्याचा शुध्द प्रामाणिक उद्योग ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने सुरु केला आहे. यावरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मधून संताप व्यक्त करीत, रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय कोणाचे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सांगोला ग्रामीण रुग्णालयात गोरगरिबांना कोरोना आजारावरती शासनाच्या उपचार सेवा मिळाव्यात, या उद्देशाने अनेक नाट्यमय घडामोडीनंतर कोविड हॉस्पिटल सुरू झाले खरं, परंतु आजही ऑक्सीजन लाईन सुरू नाही. 6 बेड चे कोविड हॉस्पिटल तेही केवळ सर्वसाधारण पॉझिटिव रुग्णांवर ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वर उपचार सुरु करून कोविड हॉस्पिटल सुरु असल्याचा देखावा केल्याची संतप्त प्रतिक्रिया रुग्ण मधून व त्यांच्या नातेवाईकांमध्ये उमटत असताना, यावर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासनाने लक्ष द्यावे अशी भावना व्यक्त होत आहे. परंतु याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने याचा थेट परिणाम सर्वसामान्य रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसताना दिसून येत आहे. काही कोरोना बाधीत रुग्णांवरच नव्हे तर इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना देखील उपचार मिळत नसल्याने, सांगोला ग्रामीण रुग्णालय असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाही संतप्त प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाइकांनी मधून उमटू लागल्याचे दिसून आले.

सांगोला ग्रामीण रुग्णालयात काल रविवारी औषध प्राशन केलेला रुग्ण दाखल झाला. नातेवाईकांनी रुग्णाला तपासण्याची विनंती केली. मात्र रुग्णालय प्रशासनातील कर्मचारी यांनी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल सुरू आहे. रुग्णाला पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे नेण्याचा मौलिक सल्ला देत वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले कर्तव्य बजावले. हा प्रकार नुकताच घडला आहे. असाच काहीसा प्रकार सांगोला ग्रामीण रुग्णालयातून अनेकदा घडल्याचे रुग्णांमधून बोलले जात आहे. कोविड रुग्णांना देखील याचा अनेकदा अनुभव आल्याची चर्चा आहे.

सांगोला ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू झाले. ज्या उद्देशाने हॉस्पिटलची सुरुवात झाली तो उद्देश देखील या ठिकाणी सार्थ होताना दिसून येत नाही. मागील कित्येक दिवसापासून ऑक्सीजन लाईन टाकून पूर्ण झाली असली तरी, आजही ऑक्सिजन आभावी गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्याचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. तरीही केवळ सहा बेडसाठी कोविड हॉस्पिटल सुरू आहे. तर कोविडच्या नावाखाली इतर आजारावरील रुग्णांना उपचाराविना माघारी परतावे लागत आहे. यावरून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचा धाक राहिला नाही का? , यासंदर्भात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासन गप्प का असा सवाल आता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मधून उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णांसह इतर आजारावरील रुग्णांवर उपचार केले जावेत अन्यथा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मधून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे.