वाढेगाव नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस" /> वाढेगाव नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे
IMG-LOGO
Home संस्कृती वाढेगाव नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे
संस्कृती

वाढेगाव नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे

September 2021 76 Views 0 Comment
IMG

वाढेगाव नाका येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती व सुशोभीकरण करावेे

 

आम. शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे राष्ट्रवादी पदवीधर संघाने निवेदनाद्वारे केली मागणी

 

सांगोला/प्रतिनिधी :

पुरातन काळापासून आजही टिकून असलेले सांगोल्याचे वैभव म्हणून ओळखले जाणारे वाढेगाव नाका सांगोला येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला शहर व तालुक्याच्या इतिहासाची साक्ष देणारी एकमेव ऐतिहासिक वास्तु म्हणून, वाढेगाव नाका सांगोला येथील राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची गेल्या काही दिवसापासून खूप दुरावस्था व पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वस्तूचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. तरी सध्याची परिस्थिती पाहता सांगोला नगरपरिषदेने राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची दुरुस्ती करून प्रवेशद्वारावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेशीच्या वरील बाजूस सिमेंटचे पक्के कॉंक्रीट करून पडणाऱ्या पावसाचा निचरा करावा. तसेच प्रवेशद्वार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वेशीच्या ठरावीक अंतरावर लोखंडी तटरक्षक बार किंवा अँगल उभे करावेत. त्याचबरोबर वेशीची झालेली किरकोळ पडझड दुरुस्त करून वेशीची डागडुजी तसेच रंगरंगोटी करावी. वेशीच्या शेजारी असलेले पिंपळाचे व चिंचेचे झाड तोडावे कारण या महाकाय वृक्षांच्या मुळ्यामुळे वेशीच्या बांधकामास धोका निर्माण होऊ लागला आहे. तरी राष्ट्रमाता जिजाऊ प्रवेशद्वाराची सद्यस्थिती पाहता तात्काळ योग्य ती पावले उचलत सांगोला नगरपरिषदेने सदर प्रवेशद्वाराची दुरुस्ती सुशोभीकरण व जतन करून इतिहासाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक वारसा जतन करावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने निवेदनाद्वारे आम. शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे करण्यात आली आहे.