बैलपोळा सणासाठी पशुपालक शेतकरी सरसावला पुढे

 

" /> बैलपोळा सणासाठी पशुपालक शेतकरी सरसावला पुढे

IMG-LOGO
Home संस्कृती बैलपोळा सणासाठी पशुपालक शेतकरी सरसावला पुढे
संस्कृती

बैलपोळा सणासाठी पशुपालक शेतकरी सरसावला पुढे

September 2021 61 Views 0 Comment
IMG

बैलपोळा सणासाठी पशुपालक शेतकरी सरसावला पुढे

 

सांगोला प्रतिनिधी :

परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्यासोबत साथ देणारे सर्जा -राजाला अर्थात बैल जोडीला पूजण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थात बैल पोळा सण साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करून विविध वस्तू विक्रीसाठी ठेवले आहेत. कोरोना काळात ही सदर वस्तू पशुपालक शेतकरी खरेदी करताना दिसून येत आहेत.

कोरोना विषाणू मुळे सर्व सण आणि उत्सव यांच्यावर निर्बंध अाले आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी अनेक जण डिस्टन्स ठेवत घरगुती पद्धतीने सण आणि उत्सव साजरे करताना दिसून येत आहेत. मात्र वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये जमिनीची मशागत करण्यासाठी राबणाऱ्या सर्जा राजाला पूजण्यासाठी अर्थात बैलपोळा सण करण्यासाठी बाजारपेठा जनावरांना सजवण्याच्या साहित्याने फुलले आहेत. आणि सदर साहित्य खरेदी करण्यासाठी पशुपालक शेतकरी आता पुढे सरसावताना दिसून येत आहे.