कवठेमंकाळ येथे आरोग्य शिबिराला "भाई गणपतराव देशमुख" "आ" /> कवठेमंकाळ येथे आरोग्य शिबिराला "भाई गणपतराव देशमुख" "आरोग्यनगरी नाव" देऊन सांगोल्याच्या जनतेचा सन्मान!
IMG-LOGO
Home आरोग्य कवठेमंकाळ येथे आरोग्य शिबिराला "भाई गणपतराव देशमुख" "आरोग्यनगरी नाव" देऊन सांगोल्याच्या जनतेचा सन्मान!
आरोग्य

कवठेमंकाळ येथे आरोग्य शिबिराला "भाई गणपतराव देशमुख" "आरोग्यनगरी नाव" देऊन सांगोल्याच्या जनतेचा सन्मान!

August 2021 71 Views 0 Comment
IMG

 

कवठेमंकाळ येथे आरोग्य शिबिराला "भाई गणपतराव देशमुख" "आरोग्य नगरी नाव" देऊन सांगोल्याच्या जनतेचा सन्मान!

कोळा /वार्ताहर

सांगोला विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ मा आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आबासाहेब यांचे संबंध जीवन सामान्य लोकांच्या सेवेत ,सहवासात गेले या नेत्याची सामान्य जनतेशी असलेली नाळ इतकी घट्ट होती की तब्बल ११ वेळा जनतेनी त्यांना निवडून दिले . महाराष्ट्रातील लोकनेत्यांची जी काही फळी होती त्यात अग्रभागी असलेलं नाव म्हणजे भाई गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुखांचा स्वर्गीय आर.आर. आबांवर विशेष लोभ होता हे तर सर्वश्रुत आहे . लोकसेवेच वसा घेतलेल्या या दोन्ही नेत्यांनी नेहमीच एकमेकांविषयी आपुलकी जपली. पाटील कुटुंबाने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी कवठेमंकाळ जिल्हा सांगली येथे आरोग्य शिबीर भरवण्यात आले होते या शिबिरास भाई गणपतरावजी देशमुख आरोग्य नगरी असे नाव देऊन सांगोला तालुक्याच्या जनतेचा सन्मान केला व भाई गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

 राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आरआबांच्या नंतर रोहित पाटील यांनी समाजकारणात लक्ष घातले रोहित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या पहिल्याच आरोग्य शिबिराला भाई गणपतराव देशमुख यांना पाहूणे म्हणून बोलावले व विचाराशी आजन्म निष्ठावंत राहिलेल्या भाईंचा सन्मान केला . आबासाहेब यांचे निधन झाल्या नंतर रोहित पाटील अनेक ठिकाणी त्या बाबतीत हळहळ व्यक्त करत भाईंना श्रद्धांजली वाहिली . मात्र या पुढे जात रोहित पाटील यांनी या वर्षी स्व.आर.आर .आबांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या ठिकाणाला भाई गणपतराव देशमुख आरोग्यनागरी असे नाव देऊन लोकहितासाठी आयुष्य वाहिलेल्या नेत्याला एक आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली . या आरोग्य शिबिराच्या प्रवेश कमानीवर भाई गणपतराव देशमुख व आर.आर .आबा यांचे संपूर्ण चित्र लावण्यात आल्याने ही प्रवेश कमान अत्यंत आकर्षक झाली आहे . या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व जाती धर्माचे हजारो सामान्य लोक घेणार आहेत . सामाजिक हिताचा कार्यक्रम आखताना देखील त्या कार्यक्रमात रोहित पाटील यांनी जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख व आर.आर आबा यांच्या कार्याची घातलेली सांगड व त्यांना अनोख्या पद्धतीने वाहिलेली श्रद्धांजली ही एकाद्या प्रगल्भ राजकीय नेत्याला ही सुचली नसती अशी भावना आज सामान्य लोकांमध्ये आहे .सांगोला तालुक्याचे युवक नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी रोहित पाटील यांना फोन करून ऋण व्यक्त केले. या शबिरास सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन विलासराव देशमुख, युवक नेते रफिक भाई तांबोळी पत्रकार जगदीश कुलकर्णी समाधान बोबडे वैभव आलदर यांनी भेट दिली.