IMG-LOGO
Home आरोग्य आरोग्य आणि शिक्षण विभाग हातात हात घालून सद्यस्थितीत सुयोग्य काम करत आहेत- गटशिक्षणाधिकारी पी.के लवटे
आरोग्य

आरोग्य आणि शिक्षण विभाग हातात हात घालून सद्यस्थितीत सुयोग्य काम करत आहेत- गटशिक्षणाधिकारी पी.के लवटे

August 2021 67 Views 0 Comment
IMG

आरोग्य आणि शिक्षण विभाग हातात हात घालून सद्यस्थितीत सुयोग्य काम करत आहेत- गटशिक्षणाधिकारी पी.के लवटे 

मंगळवेढा प्रतिनिधी

 मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावातील निगेटिव्ह डाटा भरणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनी व आरोग्य यंत्रणा यांच्या झालेला सहविचार सभेत प्रमुख नियंत्रित अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.पि.के.लवटे ,मंगळवेढा तालुका ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.नंदकुमार शिंदे हे तसेच बोराळे,भोसे, सलगर, मरवडे व आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच डाटा एन्ट्री संदर्भात इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

            कोरोना च्या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला आरोग्य यंत्रणेमार्फत रॅपिड टेस्ट घेण्यात येतात यामध्ये निगेटिव्ह निघालेल्या व्यक्तींची आयसीएमआर या पोर्टल ला निगेटिव्ह डाटा एन्ट्री होणे अपेक्षित आहे. यासाठी सुमारे 180 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेले आहेत 1 जून 2021 पासून सदरचे काम संबंधित शिक्षक कर्मचारी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य यंत्रणेला भरभरून सहकार्य करत आहेत. काही ठराविक गावांमध्ये या डेटा एंट्री पेंडिंग आहेत त्या एन्ट्री वेळेत अपडेट होण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांनी सहकार्य करण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी शिंदे साहेब यांनी केले.

         सदर प्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी माननीय मा.लवटे साहेब म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषद स्तरावर एकच समिती आहे त्यामुळे कोरोना सारख्या महाभयानक परिस्थितीचा सामना करत असताना आतापर्यंत दोन विभागांनी हातात हात घालून अत्यंत चांगले कार्य करून समाजाला एक मोठा आधार दिला आहे.अगदी रविवारच्या दिवशी सुद्धा आरोग्य यंत्रणा सुट्टी न घेता लोकांच्या मदतीसाठी अलर्ट असते गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर व या यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांवर फार मोठा ताण आहे आणि हा ताण कमी करण्यासाठी आमच्या शिक्षण विभागाचे माहे जानेवारी २०२१ पासून शाळा स्तरावर अनेक उपक्रम चालू असताना देखील यामध्ये प्रामुख्याने एनसीईआरटी चा सेतु अभ्यासक्रम,ऑनलाइन- ऑफलाइन शिक्षण असेल,झाडाखालची शाळा,पारावरची शाळा,आधार कार्ड अपडेट,सरल पोर्टल बाबत कामकाज, विद्यार्थी व पालकांचे बँक खाते काढण्याचं काम असेल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय स्वामी साहेब यांचा स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम बाबत शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत इत्यादी सर्व शालेय कामकाज जोमाने करून आमचे शिक्षक बांधव सर्वतोपरी आरोग्य यंत्रणेस एक सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करत आहेत याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन मा.लवटे साहेबांनी केले.निगेटिव्ह डाटा एन्ट्री पेंटिंग काम सर्व शिक्षक बांधव लवकर पूर्ण करून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करतील असे आव्हान साहेबांनी केली.

      सदर प्रसंगी शिक्षकांना या वाढीव कामाबाबत अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ज्या गावासाठी नेमणूक केली आहे त्याच गावचा निगेटिव डाटा संबंधित शिक्षकांना देण्यात यावा तसेच कॅम्प झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत डेटा पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडली जाईल, टेस्टिंग कॅम्पच्या दिवशी संबंधित शिक्षकांनी उपस्थित राहणे जरुरी नाही या कामासंदर्भात आरोग्य यंत्रणेने नेहमी तगादा लावणे जरुरी नाही ज्या शिक्षक बांधवांचे लसीकरण बाकी आहे तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षक बांधवांच्या घरातील 100% सदस्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण काम करावे आरोग्य यंत्रणेच्या मार्फत सर्व शिक्षक बांधवांना सन्मानपत्र मिळावे अशी अपेक्षा संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली.