IMG-LOGO
Home आरोग्य राखी पौर्णीमे निमित्त महीलासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरणाची भेट.
आरोग्य

राखी पौर्णीमे निमित्त महीलासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरणाची भेट.

August 2021 101 Views 0 Comment
IMG

मंगळवेढा ( प्रतिनिधी ) राखी पौर्णीमे निमित्त खास महीलासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोवीड लसीकरण मोहीमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे येथे गरोदर महिलेसह १००महीलांना कोवीशिल्ड लसीची पहीली मात्रा देण्यात आली.

राखीपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केद्रे, १४ ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी फक्त महीलासाठी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे अंतर्गत मरवडे सह डोणज. निंबोणी, कागस्ट, भाळवणी या उपके द्रा खालील १८ गांवातील गरोदर माता अँकॅडमीमधील मुलीसह सर्वसाधारण १०० महीलाना लसीकरण करण्यात आले.

         लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैदयकिय अधिकारी डॉ. मलप्पा माळी, . डॉ. पूनम दुधाळ, डॉ. भिमराव पडवळे यांच्या मार्ग दर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गौरीशंकर बुगडे, डॉ. महेश माळी, सिद्राया बिराजदार, आनंद हत्तरसंग, आरोग्य सहायक नागनाथ लंगोटे, आरोग्यसहायिका राणी स्वामी आरोग्य सेवक शहाजहांन मुलाणी, सी. टी. पवार, प्रवीण पवार, आरोग्य सेविका उमा हुलवान, रूपाली तिहेकर, विद्याराणी स्वामी, धानेश्वरी हिरेमठ सुधामती गंगणे, सीमा वाघमारे, औषध निर्माण अधिकारी हणमंत कलादगी, कनिष्ठ सहायक लाडलेसो मुलाणी, वाहन चालक मोहन सरडे, आशागट प्रवर्तक पूजा येडसे, आशा स्वयं सेविका निर्मला पडवळे, सारीका पवार, सुवर्णा मस्के, सीमा सोनवणे, मेघा गायकवाड, परिचर बंदप्पा कोळी, कुंडलिक हो वाळे, संभाजी भोरकडे, बाळु खांडेकर यांनी परिश्रम घेतले.