सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा; रवींद" /> सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा; रवींद्र कांबळे यांचे 26 जानेवारी ला उपोषण
IMG-LOGO
Home राजकारण सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा; रवींद्र कांबळे यांचे 26 जानेवारी ला उपोषण
राजकारण

सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा; रवींद्र कांबळे यांचे 26 जानेवारी ला उपोषण

January 2025 302 Views 0 Comment
IMG

सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा; रवींद्र कांबळे

26 जानेवारी ला उपोषण 

 

सांगोला :- 

 सांगोला शहरांमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे हे 26 जानेवारी 2025 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.

 सांगोला शहरात सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून सदरचे काम करीत असताना कामाचा दर्जा व गुणवत्ता बाबत नागरिकांमधून तक्रारी आहेत, हे काम करीत असताना वापरण्यात येणारे साहित्य पाईप, सिमेंट, चेंबर बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू, विटा याची गुणवत्ता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आहे का ? नाही तसेच सदर काम करत असताना बांधकामासाठी वापरलेली वाळू ही बेकायदेशीर (चोरीची ) आहे का ? याची चौकशी करावी.

  तसेच पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावरती खड्डे माती दगड जसेच्या तसे ठेवल्यामुळे छोटे- मोठे अपघात झाले आहेत, तरी त्वरित रस्ता ठेकेदाराने करणे गरजेचे असताना ठेकेदार मनमानी करीत आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधित कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी. तसेच याबाबत सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी यांना याबाबतची तक्रार दिली होती. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर 26 जानेवारी रोजी बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन सांगोल्याचे तहसीलदार, आमदार, माजी आमदार व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.