डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष" /> डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे
IMG-LOGO
Home राजकारण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे
राजकारण

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे

December 2024 161 Views 0 Comment
IMG

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे

सातारा/प्रतिनिधी :

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांच्या सुचनेनुसार राज्य उपाध्यक्ष सतिश सावंत यांनी सातारा जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक राज्य उपाध्यक्ष सतिश सावत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सातारा येथे पार पडली. यावेळी सातारा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आली. संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय कदम, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे तर जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने, युवराज धुमाळ, सुजितकुमार ढापरे, महेश नलावडे, राहिद सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी प्रशांत बाजी तर सहसचिव अशोक इथापे यांची निवड केली आहे. खजिनदारपदी लिंगराज साखरे, प्रसिद्धीप्रमुखपदी राहुल ताटे, जिल्हा संघटकपदी मिलिंद लोहार, जिल्हा संपर्कप्रमुखपदी सोमनाथ साखरे यांची नियुक्ती करण्यात आली. सूर्यप्रताप कांबळे, संदीप जठार, श्रीधर निकम, संजय कारंडे, नवनाथ पवार यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

प्रारंभी राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांचे स्वागत गणेश बोतालजी यांनी, तर राज्य संघटक तेजस राऊत यांचे स्वागत विकास भोसले यांनी केले. जिल्हा संघटनेच्या कामकाजाचा वार्षिक आढावा माजी जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी स्पष्ट केला.

यावेळी नवीन कार्यकारिणी सत्कार करण्यात आला. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे यांचा सत्कार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत व राज्य संघटक तेजस राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. नवनियुक्त साप्ताहिक संघटना राज्याध्यक्ष संजय कदम व महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी यांचा सत्कार करण्यात आला. राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास भोसले, तेजस राऊत यांनी संघटनेतील पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. संतोष शिराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ पवार यांनी आभार मानले. सातारा जिल्हा संघटक मिलिंद लोहार यांनी सूत्रसंचालन केले.