महायुतीचा धर्म पाळून आमदार शहाजीबापू पाटील यांना भाळवणी गटात" />
सांगोला/ प्रतिनिधी: सध्या निवडणुका या सोप्या राहिल्या नाहीत. सांगोला विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील पंधरा गावांचा समावेश आहे.सन 2019 च्या निवडणुकीत पांडुरंग परिवाराने या गटातून आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठे मताधिक्य दिले होते. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाळवणी गटातून आमदार शहाजीबापू पाटील यांना भरघोस मताधिक्य देऊ असा ठाम विश्वास आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पंढरपूर येथील बैठकीदरम्यान दिला.
. भाळवणी गटातील पांडुरंग परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी, पंढरपूर येथे घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांतराव परिचारक. आमदार शहाजीबापू पाटील , युवक नेते प्रणव परिचारक ,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्यासह भाळवणी गटातील पंधरा गावातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रशांतराव परिचारक म्हणाले, आपण कामाच्या निमित्ताने आमदारांना भेटले पाहिजे. कामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण महायुतीचे कार्यकर्ते आहोत .राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे . सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना बहुमत देऊन निवडून आणण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे .सरकारने विकासाच्या अनेक योजना राबविण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी 5 हजार कोटीहुन अधिक निधी दिला आहे. राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जिवावर चालते .या ठिकाणी , महायुतीचा धर्म पाळून आपण सर्वांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया .कोणत्याही परिस्थितीत पक्षनिष्ठा महत्त्वाची असून आघाडीचा धर्म पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बैठकीदरम्यान केले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातून पांडुरंग परिवारांने गत निवडणुकीत मोठे सहकार्य केले होते. महायुती सरकारच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघात पाच हजार कोटीहून अधिक निधी आला. शेवटच्या सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये हा निधी प्राप्त झाला व अनेक कामे मार्गी लागली. भाळवणी गटातील अनेक गावात विकासाची कामे केली आहेत .राज्यात सध्या महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यासाठी व मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी भरघोस मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन करण्यात आले. भविष्यात आपण प्रशांतराव परिचारक यांना यांना सर्वतोपरी सहकार्य करू. सांगोला विधानसभा मतदारसंघात एक मोठी औद्योग वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न आहे. आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे. पुढील पाच वर्षात तुमची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
यावेळी प्रास्ताविकात माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे यांनी भाळवणी गटातील नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न मांडले. येत्या पाच वर्षात पांडुरंग परवारातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाळवणी गटातील विकास कामे करण्यासाठी प्राधान्य द्यावे. आजपर्यंत बापूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात, विकास कामे झाली आहेत. यापुढेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार प्रशांतराव परिचारक यांना सोबत घेऊन अधिकाधिक निधी शासनाकडून मिळवून भाळवणी गटातील पंधरा गावांसाठी खर्च करावा अशी मागणी करण्यात आली. सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील 15 गावातील मतदार, आमदार शहाजीबापू पाटील यांना मताधिक्य देतील असा विश्वास व्यक्त केला.