सांगोल्यात शेकाप आणि बापू गटाला ठाकरेंच्या मशालीची धग

सांगोल्यात शेकाप आणि बापू गटाला ठाकरेंच्या मशालीची धग
IMG-LOGO
Home राजकारण सांगोल्यात शेकाप आणि बापू गटाला ठाकरेंच्या मशालीची धग
राजकारण

सांगोल्यात शेकाप आणि बापू गटाला ठाकरेंच्या मशालीची धग

October 2024 360 Views 0 Comment
IMG

सांगोल्यात शेकाप आणि बापू गटाला ठाकरेंच्या मशालीची धग

बापू गटासह शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सांगोला : तालुका प्रतिनिधी

शेकापमधील सध्याचे नेतृत्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेत नसल्याने तसेच शेकाप मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची धगधगती मशाल हाती घेतली आहे. तसेच शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील दिपकआबांच्या उपस्थितीत उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या मशालीची सर्वात जास्त धग शेकापला जाणवली आहे.
२०१९ ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे. एक-एक करत अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत पक्ष सोडून गेले आहेत. शेकापच्या सध्याच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने शेकाप मधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा रामराम ठोकत दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची मशाल हाती घेतली.
जुजारपूर येथील शेकापचे कार्यकर्ते विजय हिप्परकर, हणमंत पाटील, ईश्वर माने (गुणापवाडी), अजित पाटील, सागर पाटील, राजू गाडे, मारुती लोखंडे यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहाजीबापू गटाचे बिरू बजबळे, श्रावण हिप्परकर, सचिन हिप्परकर, दयानंद गाडे, अमोल बजबळे, योगेश यमगर, जान करडे, संजय करडे, नारायण बजबळे यांनी दीपक आबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची मशाल हाती घेतली.
यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल आहे, ती घराघरात पोहचवा, सध्या परिवर्तनाची लाट आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी माझी धडपड सुरू असून तालुक्याचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून माझी वाटचाल सुरू आहे. असा विश्वास देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याचे दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच विजय बजबळे, गणेश करांडे, प्रकाश हिप्परकर, अनिलनाना खटकाळे आदी उपस्थित होते.