IMG-LOGO
Home राजकारण सांगोला विधानसभेला धन शक्ती विरुध्द जनतेच्या निष्ठेची शक्ती आशी‌ लढत होणार--डाॅ.भाई अनिकेत देशमुख
राजकारण

सांगोला विधानसभेला धन शक्ती विरुध्द जनतेच्या निष्ठेची शक्ती आशी‌ लढत होणार--डाॅ.भाई अनिकेत देशमुख

October 2024 178 Views 0 Comment
IMG

सांगोला विधानसभेला धन शक्ती विरुध्द जनतेच्या निष्ठेची शक्ती आशी‌ लढत होणार--डाॅ.भाई अनिकेत देशमुख

 

सांगोला प्रतिनिधी 
सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आसुन स्व.आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आंम्ही दोघे भाऊ जनसेवेचा वसा पुढे घेऊन जात आहोत.कुठल्याही स्वार्था पोटी आंम्ही ही निवडणुक लढत नसुन आबासाहेबांनी ज्या प्रमाणे जनसेवा केली तसीच जनसेवा करण्साठी आंम्ही कटिबध्द आहोत या हेतुनी आंम्ही ही निवडणुक लढवत आहोत..
आबासाहेबांचे काम हिमालया एवढे आहे हे संपुर्ण राज्याला‌ माहीत आहे.आबासाहेबांनी केलेले हिमालया एवढे काम करणे जरी शक्य नसले तरी किमान सह्याद्री एवढे काम करण्याचा प्रयत्न बाबासाहेब व मि करेन.आमच्या माईंनी आंम्हाला सक्त शिकवण दिली आहे ती आपण सर्वांनी ऐकली असेलच माईंनी सांगीतले आहे कुणाचाही चाहा सुध्दा प्यायचा नाही..घरची भाकरी खायची व जनतेची चाकरी करायची.. एवढा प्रगल्ब विचार घेऊनच आंम्ही राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण करीत आहोत.
हि निवडणुक आंम्ही फक्त नि फक्त जनतेच्या विकासाठी व जनतेच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.आंम्हाला निष्ठावंत जनतेची साथ आहे ती साथ अनेक वर्षापासुन आहे.तसीच साथ येणाऱ्या निवडणुकीत देण्याची विनंती अनिकेत देशमुखांनी केली..
विधानसभेची निवडणुक हि ऐैतीहासीक निवडणुक आहे.या निवडणुकीत पैशाचा महापुर‌ आसणार आहे.सत्तेतुन पैसा व पैशाच्या माध्यमातुन‌ सत्ता या समीकरणाचा वापर सध्या सुरु आहे.परंतु एक लक्षात‌ ठेवावे ही सांगोला‌ विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी जनता आहे हे‌ पैशाला भीक घालणार नाही.या जनतेने आपला स्वाभिमान कधीच विकला‌ नाही.ही जनता आजही खंबिरपणे शेतकरी कामगार पक्षाच्या व मागे उभी राहुन डाॅ.बाबासहेब देशमुख यांना प्रचड मताने निवडुन देईल..कारण हि लढाई धनशक्ती विरुध्द निष्ठेची जनशक्ती आशी असल्याचे मत डाॅ.अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली