जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आ" /> जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आणि जयंत पाटील सांगोलाकरांच्या पाठीशी राहील - खासदार शरद पवार
IMG-LOGO
Home राजकारण जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आणि जयंत पाटील सांगोलाकरांच्या पाठीशी राहील - खासदार शरद पवार
राजकारण

जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आणि जयंत पाटील सांगोलाकरांच्या पाठीशी राहील - खासदार शरद पवार

January 2024 358 Views 0 Comment
IMG

जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आणि जयंत पाटील सांगोलाकरांच्या पाठीशी राहील - खासदार शरद पवार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्याबद्दल गणपतराव देशमुख यांना आस्था होती. दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट केले. सांगोल्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचे प्रचंड उत्पादन घेवून महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिशा दिली. १९७२ च्या दुष्काळात लोकांना वाचविण्यासाठी पालकमंत्री असताना फळबाग लागवड योजना राबविली. कृषीमंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. आम्ही लोकांशी बांधिलकी ठेवणारे आहोत. खाणाऱ्यांचा विचार जरूर करावा, परंतु शेतकऱ्यांनी पिकवले नाही तर काय खाणार ? यासाठी प्राधान्याने राज्यकर्त्यांनी पिकवणाऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे. एकवेळ उपाशी राहीन व लाचार कधीही राहणार नाही अशी शिकवण गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यातील सर्व घटकांना दिली. डॉ. अनिकेत व डॉ.बाबासाहेब, तुम्ही दोघांनी एकत्रित काम करण्याची तयारी दाखवली याचा मला आनंद झाला. तुमची एकी ही गणपतराव देशमुख जिथे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकत्रित काम करीत आहात तोपर्यंत मी आणि जयंत पाटील सांगोलाकरांच्या पाठीशी राहील असा शब्द खासदार शरद पवारांनी दिला.
सांगोल्यात दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डॉ.अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे खासदार शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा.पवार बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, रतनबाई देशमुख, बळीराम साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, बाबुराव गायकवाड, जयमाला गायकवाड, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख, तानाजी पाटील, माजी आमदार राम साळे, उत्तम जानकर, संतोष देवकते, सचिन देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, गणेश पाटील, शेखर माने, जयंत भंडारे, डॉ. प्रभाकर माळी, मोहन गुंड, संजय पाटील घाटणेकर, सुवर्णा शिवपुजे, पियूष साळुंखे पाटील, प्रभाकर चांदणे, लक्ष्मण हाके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, आबासाहेबांच्या आग्रहामुळे शरद पवार साहेबांनी फळबाग लागवड योजना राबविली. कृषी प्रदर्शन अधिक व्यापक करून याचे सातत्य ठेवावे. अनिकेत आणि बाबासाहेब हे दोघेही डॉक्टर असले तरी मी कंपाऊंडर असल्याने मी दोघांना कधीही ठीक करू शकतो. देशात महाराष्ट्र हा टर्निंग पॉइंट आहे. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करायचे आहे. अनिकेत आणि बाबासाहेब ही राम-लक्ष्मणाची जोडी सांगोल्यात नक्कीच परिवर्तन करेल. राज्यात शरद पवार आणि उध्दव ठाकरेंना सहानभूती असल्याने विरोधक राजकारणातून हद्दपार होतील इतके परिवर्तन होईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, दुधाचे उत्पन्न जास्त असले तरी दूध संघ चालत नाही. केंद्र सरकार जाहिरातीसाठी 60 हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. मूठभर लोकांच्या हातात दूध संघ आहे. डाळिंबावर प्रक्रिया उद्योग उभा करण्याची गरज आहे. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांची बिले अद्यापही मिळाली नाहीत. आंदोलन करूनही सरकारला जाग आली नाही. साखरेचे भाव कमी झाले आहेत. उसाला कांद्याला दुधाला भाव नाही. शरद पवारांनी कृषी धोरणात भरीव काम केले असल्याने शेतकऱ्यांना जगविण्यासाठी पवार साहेबांचा विचार घ्यावा लागेल अभिजीत पाटील म्हणाले.


डॉ.अनिकेत देशमुखांचा विरोधकांवर पलटवार

डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, 55 वर्षे गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब वंचित घटकांचे प्रश्न मांडले. नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी मात करून शेतीत प्रगती साधली. सत्ता नसताना काय करता येईल याचा विचार करून कृषी महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना राबविली. सध्याचे लोकप्रतिनिधी पाणी आणल्याचा दिंडोरा पिटत आहे. पण, पाण्यासाठी कोणी प्रयत्न केला, पाणी कोणी आणले आहे हे तालुक्याला माहीत असून जनता सुज्ञ आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेकाप कटीबद्ध आहे. बरीच लोकं रामायणातील कैकयीची भूमिका आमच्या दोघांमध्ये करत आहेत. त्यांना मी एवढंच सांगतो, राम आणि भरतामध्ये कधीही मतभेद नव्हते. जेवढा मान राम भरताचा करायचा, तेवढाच मान भरत रामाचा करायचा. पण जे लोकं कैकयीची भूमिका घेताहेत त्यांना आमच्या दोघांच्या वतीने सांगतो, जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, अशी शायरी सादर करून अनिकेत देशमुखांनी विरोधकांचा खरपूर समाचार घेतला.